⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | राज्यातील अनुकंपा धारकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता !

राज्यातील अनुकंपा धारकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अनुकंपा भरती प्रक्रिया गुलाबराव पाटील यांनी पूर्ण केल्यामुळे राज्यातील ४५० अनुकंपा धारकांना मिळाला न्याय !

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२४ । पाळधी (ता. धरणगाव) येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अनुकंपाकृती समितीच्या वतीने (दि. 24) रोजी राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या अनुकंपा धारकांनी पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पाळधी येथे आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अनुकंपा कृती समितीच्या वतीने जाहीर सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या इतिहासात अनुकंपा भरती प्रक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात पुर्णत्वास आली. गेली २० वर्ष विविध आंदोलने,’ धरणे तसेच उपोषणाच्या माध्यमातून अनुकंपा धारक न्यायेच्या प्रतिक्षेत होता. अखेर गुलाबराव पाटील यांच्या कार्यकाळात आतापर्यंत ४५० अनुकंपा धारकांना नोकरी मिळाली. तर ४५० कुटुंबियांचे पुनर्वसन त्यांनी केले. याशिवाय प्रतिक्षा यादीतील उर्वरित १०० ते १५० अनुकंपा धारकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रशासनास निर्देश दिले. त्यानुषंगाने कार्यवाही देखील सुरू आहे. म्हणजेच जवळपास ६०० कुटुंबियांना त्यांनी न्याय मिळवून दिल्याबद्दल राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या अनुकंपा धारकांनी त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेपाळमध्ये जळगाव जिल्ह्यातील अपघातात मृत झालेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती, मुकुंद नन्नवरे, सचिन पवार, पत्रकार विलास झंवर, दीपक झंवर, सतिश सांगळे, अविनाश गडगे, सुनील भेरे, विजय माळी, काशिफ कुरेशी, किशोर लाहे, अमोल बोरकर, पुष्पराजे पुरे, संदीप कोरडे, मंजुनाथ गवळी, श्री मोंडेकर, भक्तराम फड, संतोष नागरे, प्रविण तेजारे, अमित जाधव, शाहीद मुल्ला, अजय यादव, महेश पाटील, सागर पाटील, विनुस शेख, श्रीमती यामिनी जोशी, स्वप्नील कुलकर्णी, निलेश कांडेकर, प्रशांत जोगी, नितेश भागवत, ओंकार गानमोटे, महेश चौधरी, सौ. मिनाक्षी टोकलवार यांची उपस्थिती होती. तसेच याप्रसंगी सतीश सांगळे यांनी सदस्य सचिव निषेक कृष्णा, मुख्य प्रशासकीय अधिकारी दिपाली देशपांडे यांचे आभार व्यक्त केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.