यावल येथे धान्य खरेदीस आ. सोनवणेंच्या हस्ते शुभारंभ

जून 19, 2021 2:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२१ । यावल तालुक्यातील शेतकरी बाधवाच्या रब्बी हंगामाचे भरड धान्य ज्वारी व मका या धान्याची शासकीय किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केंद्राचे शुभारंभ चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आ. लता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. 

yawal

यावल येथील तहसील कार्यालयाजवळील सातोद कोळवद मार्गावरील शासकीय गोदामावर पार पडलेल्या या कार्यक्रमात आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते काटा पूजन व धान्य पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी यावरचे तहसिलदार महेश पवार, उपजिल्हाप्रमुख तथा क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यावल क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक क्रुषी भुषन नारायण शंशिकात चौधरी,  शिवसेने तालुकाप्रमुख रवी सोनवणे शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख गोटू सोनवणे, यावल क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बारी, संचालक पप्पू जोशी,अजहर खाटीक, योगेश पाटील, स्वराजफाउडेशनचे भरत चौधरी, उपतालुका प्रमुख, भगतसिंग हाकेला, क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका कांचन फलक, विभाग प्रमुख आशिष झुरकाळे, रोहिदास महाजन, दिनेश साळुंके, सुधाकर पाटील,  कोकपावली विकास सोसायटीचे चेअकज तथा क्रुउबचे संचालक राकेश फेगडे, भरत चौधरी, सुर्यभान पाटील, समाधान सोनवणे, महेंद्र चौधरी, संतोष महाजन, राष्ट्रवादीचे ललित पाटील, प्रवीण महाजन, नाना धनगर, आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now