जळगाव जिल्हा

प्रवाशांना दिलासा; एसटीची राज्यासह परराज्यातही सेवा सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । कोरोनामुळे शासनातर्फे राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळातर्फे बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन हटविल्यानंतर बससेवेला पुन्हा सुरुवात झाली असून राज्यासह परराज्यातही बससेवा सुरु करण्यात आली आहे.

राज्यासह देशभरात कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शासनाकडून काही महिन्यांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळातर्फे अत्यावश्यक सेवा वगळता प्रवाशांसाठी लॉकडाऊन काळात बससेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर, शासनाने लॉकडाऊन उठविल्यानंतर महामंडळातर्फे राज्यासह परराज्यातही बससेवा सुरू करण्यात आली आहे.

ऑनलाईन आरक्षणाची सुविधा
प्रवाशांचा प्रतिसाद असलेल्या ठिकाणी जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून बसेस सोडण्यात येत आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी परराज्यात जाणाऱ्या बसेसला ऑनलाईन आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत. जळगाव आगारातर्फे सुरत, अंकलेश्वर, वापी, सेल्वासा, बडोदा या मार्गावर बसेस सोडण्यात येत आहे. सध्या अंकलेश्वर, सेल्वासा, सुरत या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे. बससेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय टळली असून प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button