जळगाव जिल्हाजळगाव शहर

मोठी बातमी : जळगावच्या आकाशात दिसले आगीचे गोळे?, नागरिकांमध्ये संभ्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२२ । जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागात शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आकाशात आगीच्या गोळ्याप्रमाणे फटाक्यांसारखा चमचमाट पहायला मिळाला. पश्चिमेकडून पूर्व दिशेने जात असलेले चार गोळे काही काळानंतर नष्ट झाल्याचे नागरिकांनी अनुभवले. अनेकांनी हे दृश्य मोबाईल कॅमेरात कैद केले असून हे नेमकं काय होतं याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात शनिवारी रात्री ७.४० ते ७.४८ दरम्यान अचानक आकाशात दिवाळीतील शोभेच्या फाटक्याप्रमाणे आगीचे ४ गोळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना नागरिकांना दिसले. अचानक आकाशात दिसत असलेल्या या चमकदार वस्तू काय? याचा विचार करीत नागरिकांनी ते कॅमेऱ्यात कैद केले. घटनेनंतर नागरिकांनी व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केले असून एकमेकांना विचारणा केली जात आहे.

जिल्ह्यातील काही खगोलशास्त्र तज्ज्ञांच्या मते हे आगीचे गोळे म्हणजे अवकाशातील कचरा आहे. अवकाशात विविध उपग्रहांचक मोठा कचरा कायम पृथ्वीभोवती फिरत असतो. पृथ्वीच्या ऑक्सिजन थराच्या संपर्कात आल्यानंतर तो पेट घेतो त्यामुळे अशी दृश्ये पहावयास मिळतात. दरम्यान, आकाशात दिसलेले ते काय होते हे निश्चित नसले तरी त्याबाबत नागरिक वेगवेगळे तर्कवितर्क लढवीत आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button