भुसावळात काेम्बिंग ऑपरेशन; मध्यरात्री दाेन संशयितांच्या आवळल्या मुसक्या

डिसेंबर 16, 2021 4:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । भुसावळात दिवसेन दिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने १२ दिवसांत दुसऱ्यांदा कोम्बिंग ऑपरेशन राबवले. १४ रोजी रात्रीच्या कारवाईत दाेन संशयितांच्या मुसक्या आवळल्या,नितीन संजय बाेयत (रा.वाल्मीक नगर, भुसावळ) आणि अक्रम शेख फकीर माेहंमद (रा.बागवान गल्ली,भुसावळ) अशी त्या दोघांची नावे आहे तर एका वॉटेंड आराेपीला अटक केली. याशिवाय २३ हिस्ट्रीसिटर असलेल्यांकडे घरी जावून चौकशी करण्यात आली.

कोम्बिंग ऑपरेशन jpg webp

मंगळवारी रात्री ११ ते बुधवारी पहाटे ३ वाजेपर्यत पाेलिसांनी शहरातील विविध भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. शहर,बाजारपेठ,तालुका व नशिराबाद पाेलिस ठाण्याच्या हद्दीत मोहीम राबवली गेली. भुसावळ शहरात वैतागवाडी, खडका राेड,रजा टाॅवर चाैक,महात्मा फुले नगर परिसर,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जाम माेहल्ला या परिसरात कारवाई झाली.६ अटक वाॅरंट, २ बीडब्ल्यू वाॅरंट, ५३ समन्स बजावणी, वॉटेंड २२ आराेपींची तपासणी झाली. त्यापैकी एक आरोपी सापडला. तर रात्री संशयितपणे फिरणाऱ्या दाेघांच्या मुसक्या आवळल्या. नितीन संजय बाेयत (रा.वाल्मीक नगर, भुसावळ) आणि अक्रम शेख फकीर माेहंमद (रा.बागवान गल्ली, भुसावळ) अशी त्या दोघांची नावे आहेत. नाकाबंदी दरम्यान ११ वाहनांची तपासणी करून दंड आकारण्यात आला. एक वाहन पडताळणीसाठी ताब्यात घेतले. हद्दपार असलेल्या ११ जणांच्या घरी तपासणी केली. मात्र, कुणीही आढळले नाही. तसेच ३२ हस्ट्रीसिटरपैकी २३ जण मिळून आले. त्यांची नाेंद पाेलिसांनी घेतली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now