जळगाव जिल्ह्यात हुडहुडी आणखी वाढला; काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

डिसेंबर 8, 2025 10:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२५ । गेल्या काही दिवसापासून राज्यातून थंडीने ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा एकदा पारा घसरला असून त्यामुळे हुडहुडी भरण्यास सुरूवात होत आहे. हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. ११ ते १२ डिसेंबरनंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीची लाट पसरण्याची दाट शक्यता आहे.

Thandi jpg webp

रविवारी जळगावचा पारा १२.२ अंशांवर होता. किमान पारा वाढला असला तरी थंडीचा कडाका जाणवत आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे जोरात मध्य महाराष्ट्राकडे वाहत असल्याने गारठा अधिक वाढल्याचे जाणवते. मागील काही वर्षांत डिसेंबर-जानेवारी महिन्यात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळे निर्माण होत असल्याने हिवाळ्याचा कडाका कमी झाला होता. मात्र, यंदा डिसेंबर महिन्यात अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे संपूर्ण डिसेंबर महिना कडक थंडीचा राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात पुन्हा थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. ११ ते १२ डिसेंबरनंतर जळगाव जिल्ह्यात थंडी आणखी वाढेल. आज सोमवारी रेडिएटिव्ह फॉगमुळे दृश्यमानता ४०० मीटरपर्यंत खाली येईल आणि सरासरी किमान तापमान ११ अंशांपेक्षाही खाली राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories