जळगावसह राज्यात हुडहुडी कायम !

नोव्हेंबर 18, 2025 11:29 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२५ । उत्तरेकडील शीत वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठला असून काल खान्देशातील धुळे येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.२ अंश तापमान नोंदले गेले. जळगावातही थंडीचा कडाका कायम असून आज उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा असून, उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

thandi tempreture

सध्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्राला अक्षरशः गारठून टाकले आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली घसरला आहे. कमाल तापमानात हळूहळू घट होत असून निवडक ठिकाणी पारा अद्यापही ३० डिग्री सेल्सियस पार आहे. पहाटे जाणवणारी हुडहुडी सकाळी उशिरापर्यंत टिकून राहत असून, धुके आणि दव पडल्याची चित्र कायम आहे.

काल धुळे येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ६.२ अंश तापमान नोंदले गेले. तर जेऊर आणि परभणी येथे ८ अंश तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि ८.३ अंश सेल्सिअस, तर अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, ‎यवतमाळ येथे किमान तापमान १० अंशांच्या खाली घसरले असून थंडीची लाट आहे. पुणे, महाबळेश्वर, मालेगाव, अमरावती, भंडारा, ‎गोंदिया, ‎नागपूर, ‎वाशीम येथे पारा ११ अंशांच्या खाली असल्याने गारठा वाढला आहे.

सध्या जळगाव शहरातही गुलाबी थंडी पसरलीय आणि या थंडीचा नागरिक आनंद घेताना दिसतात. शहरावर सकाळी हलक्या धुक्याचे साम्राज्य पसरत आहे. आगामी काही दिवस जळगावात थंडीची तीव्रता कायम राहण्याचा अंदाज आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now