जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२६ । भारतीय जनता युवा मोर्चा, जळगाव महानगर तर्फे प्रभाग क्रमांक 8 मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ “कॉफी विथ युथ” या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन प्रभागातील रायसोनी नगर परिसरात उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेवक विशाल सुरेश (राजूमामा) भोळे, प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार अमर जैन, नरेंद्र पाटील, सौ.कविता सागर पाटील सौ.मानसीताई भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भाजपा युवा मोर्चाचे मा.प्रदेश सचिव अमितजी सोळुंके प्रभारी रोहित सोनवणे, उपाध्यक्ष भरत कर्डिले, सतनामसिंह बावरी, चिटणीस अनुराज मराठे, युवा मोर्चा मंडल क्र5 चे अध्यक्ष गौरव राजपुत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम प्रदेश उपाध्यक्षा भैरवीताई वाघ-पलांडे, जिल्हाध्यक्ष महेश रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमादरम्यान युवक व नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या विकासात्मक धोरणांबाबत, प्रभागातील समस्या व भविष्यातील विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी परिसरातील नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महायुतीच्या उमेदवारांना प्रभागातील युवक व नागरिकांचा वाढता पाठिंबा या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आला.





