जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२१ । चोपडा येथील सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. दि. ४ सप्टेंबर रोजी भाडेतत्त्वावर देण्यासाठी ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. दि.१८ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन निविदा मागवण्यात आल्या होत्या. दि.२० सप्टेंबर रोजी पुणे येथील साखर आयुक्तलयातील आयुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत टेंडर फोडण्यात आले. तर त्यात उसाच्या प्रति टनाला सर्वात जास्त भाव देणारे म्हणजेच ११५/- रुपये प्रति टन ऊसाला टॅगिंग भाव बारामती अग्रोने दिला म्हणून हा दर सर्वात जास्त असल्याने बारामती ॲग्रो कडे येथील साखर कारखाना भाडे तत्वाने दिला जाणार आहे. अखेर बारामती ऍग्रो कडे येथील कारखान्याची धुरा सुपूर्द केली जाणार आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया दिनांक २० रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेपर्यंत करण्यात आली.अशी माहिती चेअरमन अतुल ठाकरे यांनी दिली.
चोसाका भाडेतत्त्वावर घेण्यासाठी चार कारखान्यानी निविदा भरली होती. त्यात लातूर येथील धारावी साखर कारखाना, परभणी येथील जकराया साखर कारखाना, कोल्हापूर ये सिद्धिकी साखर कारखाना आणि बारामती येथील बारामती ऍग्रो यांनी निविदा भरलेल्या होत्या. या निविदेमध्ये धारावी साखर कारखान्याने १०५ रुपये, जकराया साखर कारखाना ने १०८ रुपये, सिद्धिकी साखर कारखान्याने ११० रुपये प्रति टन उसाला टॅगिंगचा भाव भरला असल्याने त्यांच्या पेक्षा सर्वात जास्त भाव बारामती येथील बारामती ऍग्रो चा प्रतिटन उसाला ११५ रुपये असल्यामुळे आणि दरवर्षी चोपडा सहकारी साखर कारखान्याला ५० लाख रुपये भाडे दिले जाणार असल्याने अखेर बारामती ॲग्रो कडे हा करताना सुपूर्द केला जाणार आहे.
पुणे येथील साखर आयुक्तालयात आयुक्त शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व साखर कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे, व्हा. चेअरमन शशी देवरे, संचालक सुनील महाजन, गोपाल धनगर, बाळासाहेब ऊर्फ विजय दत्तात्रय पाटील, अनिल पाटील, प्रदीप पाटील, विनोद पाटील आणि प्रभारी कार्यकारी संचालक अकबर पिंजारी, सचिव आधार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व चारही टेंडर फोडण्यात आले. या टेंडर मध्ये बारामती ऍग्रो चा सर्वात जास्त भाव असल्याने बारामती ॲग्रो कडे येथील कारखाना सुपुर्द केला जाणार आहे. यावेळी बारामती ॲग्रो चे व्हाईस चेअरमन सुभाष गुळवे हेही उपस्थित होते. सदर टेंडर प्रक्रियेचा अहवाल साखर आयुक्तालया मार्फत मंत्रालयात सहकार विभागाचे अध्यक्ष अर्थात मंत्री बाळासाहेब शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला जाणार आहे. त्यानंतर यावर खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होणार आहे. त्यांची मंजुरीही अंतिम मंजुरी असणार आहे.
आडसाली ऊस लागवडी वर भर द्यावा :: चेअरमन दरम्यान साखर
कारखाना याच हंगामात सुरू होणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व बागायतदार शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीवर जास्त भर द्यावा. आणि जास्तीत जास्त ऊस लागवड करावी. ऊस लागवड करताना प्रामुख्याने ८००५, ८६०३२ आणि ८६०३२ गोल्डन याच जातीच्या उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करावी, जेणेकरून उसाचे टणेज व साखरेचा उताराही या उसा मधून जास्त येत असल्याने आडसाली ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांनी भर द्यावा असे त्यांनी आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे. अखेर तीन वर्षानंतर चोपडा साखर कारखान्याची चाके फिरणार असून चिमणीतून धूर बाहेर पडणार आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे मोठे व बागायतदार शेतकऱ्यांनी बोलत आहेत.
कर्मचाऱ्यांचाही अथक प्रयत्न:
दरम्यान चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ यांच्या साथीला कर्मचाऱ्यांनी कंबर कसल्याने कर्मचारी व संघटनेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, अकाउंट विभाग मधील सर्व कर्मचारी यांनी भाडेतत्त्वावर देण्यासाठीचा निर्णय झाल्यानंतर अथक परिश्रम घेतले. वेळोवेळी ज्या त्रुटी आल्या त्या त्रुटी दूर करण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले. म्हणूनच हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात संचालक मंडळाला यश आले आहे.अशी प्रतिक्रिया पुरुषोत्तम पाटील, अध्यक्ष कर्मचारी युनियन साखर कारखाना चोपडा यांनी दिली आहे.