जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२४ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जळगावच्या सागर पार्क येथे महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला बोलताना मुख्यमंत्री यांनी जळगावकरांना आनंदाची बातमी दिली. जळगाव शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी १०० कोटींचा निधीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय.
मागील गेल्या काही महिन्यात जळगाव शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची कामे झाली असून अजून सुरु आहे. तर काही ठिकाणच्या रस्त्यांसाठी अजून निधीची गरज असल्याने जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती.
त्यांनतर आज जळगावच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी देखील जळगावच्या रस्त्यांच्या विकासासाठी 100 कोटी रुपये द्यावे अशी मागणी आमच्या जळगाव मधल्या नेत्यांनी केली असल्याचं म्हटलं होते. यानंतर मुख्यमंत्री यांनी कार्यक्रमात संबंधित करताना जळगाव शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी १०० कोटीच्या निधीची घोषणा केली. यामुळे आमदार राजूमामा भोळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरातील नवीन तसेच खराब रस्ते दुरुस्तीला वेग मिळणार आहे.