⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगावसह राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण ; हवामान खात्याने वर्तविला ‘हा’ नवीन अंदाज?

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२३ । राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत असून काही भागात उन्हाचा कडाका तर काही ठिकाणी पुन्हा अवकळी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान खात्याने उद्या म्हणजे 1 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रासह देशातील विविध भागात अवकाळी पावसाने सावट आहे. देशातील अनेक भागात पावसाचे जोरदार हजेरी लावली. यंदा प्रचंड उकाडा होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, बिन मौसम बरसात सुरू झाल्याने मार्चमध्येच थंडी पडली आहे. त्यामुळे लोक आता घरातून बाहेर पडताना छत्र्या घेऊनच बाहेर पडताना दिसत आहे.

काही ठिकाणी तर विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी गारपीटी होताना दिसत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यातील अनेक जिल्ह्यात हेच चित्र दिसत आहे.

आधीच महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. त्यातच आता हवामान विभागानं आज राज्याच्या काही भागात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाणार असल्याने बळीराजा अधिकच चिंतातूर झाला आहे.

या भागात पावसाची शक्यता
हवामान खात्याने राज्यातील मुंबईसह कोकणातील चार जिल्हे, विदर्भातील बुलढाणा ते गोंदिया, वाशिम ते गडचिरोली अशा काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक, कोल्हापूर सांगली आणि सोलापूरपर्यंत अशा 11 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहे. मात्र, अद्यापही कुठेही मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला नाही.