---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

बापरे! चोपड्यात महाविद्यालयातील लिपिकाने केला तब्बल ५० लाखाचा गैरव्यवहार

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२३ । चोपडा शहरातील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील लिपिकाने 50 लाखांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान दत्तात्रय पाटील असं संशयित लिपिकाचे नाव आहे. हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

apahar bank jpg webp

विजय नारायण बोरसे (वय ५३, रा. परीस पार्क, चोपडा) यांनी या संदर्भात फिर्याद दिली असून, या फिर्यादीत नमूद केले, की श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालय (चोपडा) या ठिकाणी लिपिक (असिस्टंट अकाउंटंट) म्हणून काम करणारे समाधान दत्तात्रय पाटील यांनी २०१४ ते २०२२ दरम्यान संस्थेत विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असलेला डाटा, त्यांच्याकडून घेतलेली फी, याची माहिती ठेवण्यासाठी वापरात येण्यात असलेले सॉफ्टवेअर, स्वतःच्या नावाचा यूजर आयडी, पासवर्ड तसेच सुभाष यादवराव पाटील, पी. ए. देशमुख आणि संजय नरेंद्र कुलकर्णी यांचा एसएमके यूजर आयडी पासवर्डचा दुरुपयोग करून २ हजार ९४३ विद्यार्थ्यांकडून फी म्हणून पैसे घेऊन त्यांची स्वाक्षरी करून पैसे घेतल्याची पावती दिली.

---Advertisement---

परंतु त्यांच्या कॅशबुकमध्ये नोंद न करता ५० लाख ६७ हजार ८९७ रुपयांचा गैरव्यवहार करून संस्थेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी समाधान पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष चव्हाण तपास करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---