---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

५०० रुपयाची लाच भोवली ; लघू पाटबंधारे विभागातील लिपीक एसीबीच्या जाळ्यात

chalisagaon1
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । चाळीसगाव येथील लघू पाटबंधारे विभागातील लिपीकास ५०० रुपयाची लाच घेताना आज शुक्रवारी धुळे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. सुरेश बेनिराम वाणी (वय ५८ वर्ष) असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

chalisagaon1

याबाबत असे की, तक्रारदार यांना लाघू पाटबंधारे लाभ क्षेत्राचा दाखला हवा होता. यासाठी चाळीगाव लघू पाटबंधारे विभागातील लिपीक सुरेश वाणी यांनी ५०० रुपयांची लाचेची मागणी केली.  त्यानुसार तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात हा सापळा रचून पथकाने आज शुक्रवारी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास सापळा रचून लिपीक सोनवणे हा दाखल्यासाठी ५०० रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर लघू पाटबंधारे विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

---Advertisement---

यांनी केली कारवाई

सापळा यशस्वी करण्यासाठी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, कर्मचारी राजन कदम, कैलास जोहरे, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भुषण खलानेकर, भूषण शेटे, चालक सुधीर मोरे यांच्या पथकाने कर्तव्य बजावले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---