महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी ; VIDEO व्हायरल..
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । क्षुल्लक कारणावरून लोकांमध्ये वाद-विवाद होत असल्याचं आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी पाहतो. मात्र अशात महाविद्यालयातील तरुणींचा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे
नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या महाविद्यालयातील हा व्हिडिओ असून हाणामारीची जोरदार चर्चा होत आहे. तरुणी आपापसात भिडण्यामागील कारण अद्याप समोर आले नसले तरी उपहार गृहात सुरुवातीला शाब्दिक वाद झाला होता. हाणामारीमध्ये मुली एकमेकींच्या झिंज्या उपटत आहे. केस ओढतांना दिसून येत आहे. हीच फ्री स्टाईल हाणामारी महाविद्यालयातील तरूणांणी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित करत व्हायरल केली आहे
दरम्यान, मुलींसह त्यांच्या पालकांना नाशिकच्या सरकारवाडा पोलीसांनी समज देण्यात आली आहे. महाविद्यालयात प्रशासनाने याबाबत मुलींसह त्यांच्या पालकांकडून लेखी माफी लिहून घेतली जाणार आहे. जेणेकरून पुन्हा असे प्रकार घडणार नाही.
पाहा व्हिडिओ –