जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२२ । नुकतीच महानगरपालिकेमध्ये महासभा आयोजित करण्यात आली होती. या महासभेमध्ये अमृत योजनेच्या डीपीआर वरून नगरसेवक आणि प्रशासनात चांगलीच जुंपली असल्याचे निदर्शनास आले. निसर्ग कन्सल्टन्सीचे काम रद्द करण्याच्या ठराव महासभेत रद्द करण्यात आला. 62 कोटीच्या निधीतील रस्त्यांच्या कामाचे अंदाजपत्रक देखील निसर्ग कडून केले जात आहे. या वादात मनपा प्रशासनाने डीपीआरचे काम देखील थांबवले आहे. पर्यायी रस्त्याचे काम आता रखडणार आहे.
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या महासभेत अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील डी पी आर कोणी करायचा यावरून प्रशासन विरुद्ध नगरसेवक असे वाद पाहिला मिळाले. यावेळी नगरसेवकांनी शहर अभियंता गिरगावकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. पर्यायी या वादाचे संपूर्ण परिणाम आता जळगाव शहराच्या रस्त्यांच्या कामावर पाहायला मिळणार आहेत.
महासभेत प्रस्ताव तहकूब केला असला तरी , निसर्गचे काम थांबवण्यासाठी बहुमत अथवा सर्वानुमते ठराव पारित करावा लागणार आहे. त्यानंतरच प्रशासनाकडून पुढची प्रक्रिया राबवली जाणार आहे. पर्यायी सध्या सुरू असलेले डीपीआरच्या अंदाजपत्रकाचे काम थांबवण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने भूमिका घेतली आहे.