नागरिकांनो.. व्यसनांपासून दूर रहा : पोलिस निरीक्षक गायकवाड
जळगाव लाईव्ह न्यूज । ऑक्टोबर २०२२ । आजच्या अत्याधुनिक व धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे सर्वांना फार महत्त्वाची बाब आहे. खानपान, योग्य व पोषक आहार घेणे, पुरेसा व्यायाम योगासने ना करणे तसेच आपल्या शरीरात होणारे छोटे-मोठे आजार विकार व दुखण्यांकडे आपण दुर्लक्ष करीत असतो त्यामुळे भविष्यात आपणास मोठ्या विकारांना सामोरे जावे लागत. विविध आजारांना आळा घालण्यासाठी सर्वांनी नियमित आरोग्य तपासणी करावी तसेच व्यसनांपासून दूर राहणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले.
खडका रोड परीसरातील आनंदराव कॉलनी पाटील मळा भागात आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. शिबिरात प्रमुख पाहुणे डॉ.हेमंत भाऊराव बर्हाटे, महेश राधेश्याम झंवर, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, नगरसेविका नीलिमा सचिन पाटील, समाजसेवक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिबिरात परिसरातील 500 नागरीकांनी आप आपल्या आरोग्याची तपासणी करून लाभ घेतला.