⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे कायदेविषयक शिबिर

जळगाव लाईव्ह न्युज । २९ एप्रिल २०२२ । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि आरोग्य विभाग जळगाव शहर मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने दि २९ रोजी मनपा सभागृहात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात प्रसूतीपूर्व लिंग निदान कायदा अर्थात पीसी अँड पीएनडीटी या विषयावर सहा.सरकारी अभियोक्ता रंजना पाटील तसेच विवाह प्रतिबंधक कायदा या विषयावर विशेष सहा.सरकारी अभियोक्ता स्वाती निकम यांनी कायद्यातील तरतुदीनवर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शेख यांनी विधी सेवा प्राधिकरणातर्फे राबविले जाणारे उपक्रम आणि विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.जी.नाईक आणि त्यांची कन्या देवयानी नाईक यांनी केले. आभार मनपा उपायुक्त श्याम गोसावी यांनी मानले. कार्यक्रमास सहा आयुक्त अभिजीत बाविस्कर, प्रमुख वैद्यकीय अधिकारी रावलानि, नेहा भारंबे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास समांतर विधि सहाय्यक अरिफ पटेल, आरोग्य विभाग आणि दवाखाना विभागातील कर्मचारी महिला अंगणवाडी सेविका आणि बालवाडी विभागातील महिला यांची उपस्थिती होती.