⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर | नागरिकांनो, सावधान : अनोळखी लिंकला क्लिक करू नका, जामनेरच्या तरुणाला ‘इतक्या’ हजारांचा गंडा!

नागरिकांनो, सावधान : अनोळखी लिंकला क्लिक करू नका, जामनेरच्या तरुणाला ‘इतक्या’ हजारांचा गंडा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jamner News- जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । जामनेर येथील २८ वर्षीय तरुणाला अनोळखी लिंकवर क्लिक करताच 39 हजारांचा आर्थिक फटका बसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख सुफीयाना शेख कलिम (28, रा.जामनेर पुरा) यांच्या मोबाईलवर मंगळवार, 13 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास 7381708207 या मोबाईलवरून एक एस.एम.एस.आला. एसएमएसमधील लिंकवर क्लिक करताच त्यांच्या क्रेडीट कार्डमधून 39 हजार रुपये कपात झालेत. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेख सुफीयाना यांनी 7381708207 या मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास हवालदार विनोद पाटील हे करीत आहेत.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह