---Advertisement---
रावेर

सावदा येथे कोव्हेक्सीनच्या दुसऱ्या डोसची नागरिकांना प्रतीक्षा

vaccination on corona is effective
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । सावदा येथे मार्च पासून लसीकरण सुरू झालें असून येथे प्रथम जवळपास 20 दिवस व त्या पेक्षा जास्त दिवस नागरिकांना कोव्हेक्सीन ही लस देण्यात आली त्या नंतर आता येथे कोविशिल्ड ही लस देण्यात येत आहे.

vaccination on corona is effective

मात्र, प्रथम “कोव्हेक्सीन” घेणाऱ्या नागरिकांना प्रथम डोस घेऊन जवळपास 40 दिवस उलटून गेले असून त्यांना आता कोव्हेक्सीन चा दुसरा डोस घेणे अनिवार्य झाले असताना सदर लस येथे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची चांगलीच वणवण होत असून अनेक दुसऱ्या ठिकाणी किंवा खाजगी रुग्णालयात देखील ती उपलब्ध होत नसल्याने आता या नागरिकांना चिंता लागली असून जर दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर आता पुढे काय करावे ही देखील चिंता लागून आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात तपास केला असता वरून जी लस येईल ती आपण देतो आम्हाला कोणती लस हवी ती मागणी करता येत नाही असे समजले त्या मुळे आता कोव्हेक्सीन च्या दुसऱ्या डोस साठी नागरिकांना आता मात्र पर्याय सापडत नसल्याचे चित्र सध्या शहरात आहे.

---Advertisement---

दरम्यान एन कोरोना काळात सर्वच लोकप्रतिनिधी इतरत्र दुसऱ्या गावाकडे लक्ष पुरवत असतांना सावदा शहराकडे मात्र पाहिजे तेवढे लक्ष नसल्याने नागरिकांना मात्र आता कोणाकडे याबाबत विचारणा करावी असा प्रश्न पडला.  कोव्हेक्सीन च्या दुसरा डोस मिळेल या आशेने दररोज नागरिक सकाळ पासून येथील लसीकरण केंद्रावर गर्दी करतात. मात्र. सदर लस उपलब्ध नसल्याचे समजताच त्यांना परत माघारी फिरावे लागते हा प्रकार सुमारे 8 ते 10 दिवसा पासून सुरू आहे मात्र लोकप्रतिनिधीचे याकडे पुरेसे लक्ष नसल्याने नागरिकांत मात्र आता नाराजीचे सुरू दिसत आहे. आता तरी लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा यांनी याकडे लक्ष पुरवून प्रामुख्याने कोव्हेक्सीन चा दुसरा डोस येथे नागरिकांना प्राधान्याने कसा देता येईल यासाठी प्रयत्न व नियोजन करणे अती आवश्यक झाले आहे व तातडीने सदर उपलब्ध व्हावी तशी अपेक्षा देखील आता नागरिक व्यक्त करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---