सिहोर येथे नागरिकांचे होत आहेत हाल : रुद्राक्ष वाटप झाले बंद

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२३ । प्रसिद्ध कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या आश्रम येथे होत असलेल्या सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सवात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व गर्दीमुळे येथे मोठ्याप्रमाणावर गदारोळ पाहिला मिळाला तर दुसऱ्या दिवशीही असाच गोंधळ पाहिला मिळत आहे.

पाहिला गेलो तर या ठिकाणाहून जाणाऱ्यांच्या संख्येपेक्षा येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या ठिकाणी पाण्याची सोय नाही. तर भोईनाची सोय केली जात आहे. विठ्ठलेश्वर समितीचे लोक काहीही करायला घाबरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

झालेल्या या गदारोळ्यामुळे या ठिकाणी गुरुवारी रुद्राक्ष वितरण बंद करण्यात आले होते. तर शुक्रवारी म्हणजे आज सकाळी देखील रुद्राक्ष वितरण उघडण्यात आलेले नाही. असं असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणावर रुद्राक्ष मिळेल या आशेने काउंटर समोर उभे आहेत. तर दुसरीकडे नागरिकांनी पुन्हा घरी जायला देखील सुरुवात करत आहे.

भुवनेश्वर धाम येथे झालेल्या अभूतपूर्व गर्दीमुळे भोपाल – इंदोर हायवे वर मोठी ट्रॅफिक पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे बस भरून भरून नागरिक सिहोर येथे जात आहेत. कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा आणि आयोजक समितीतर्फे आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉप वर मोठ्या संख्येने नागरिक उभे असलेले पाहायला मिळत आहेत.

या ठिकाणी नागरिकांचे फोन स्विच ऑफ झाले असून मोबाईल चार्ज करण्याची कोणतीही सोय झालेली नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. आणि या गर्दीतही एकमेकांशी बोलता येत नसल्याने नागरिक चांगले चिंतेत आहेत. नागरिकांना राहायची सोय होत नसल्याने नागरिक स्टेशन आणि बस स्टॉपवर वेळ काढूपणा करत आहेत.