जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच CISF मध्ये भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर असून CISF मार्फत मोठी पदभरती जाहीर करण्यात आलीय. याबाबतची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी अर्ज करावा. CISF Bharti 2025

CISF ने कॉन्स्टेबल/ड्रायव्हर पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीद्वारे एकूण ११२४ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in ला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज भरू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२५ पर्यंत आहे. CISF Recruitment 2025
रिक्त पदाचे नाव :
1) कॉन्स्टेबल/ड्रायव्हर 845
2) कॉन्स्टेबल/(ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर) 279
आवश्यक पात्रता :
मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. जड आणि हलके वाहने चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : या भरतीसाठी, उमेदवाराचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय २७ वर्षे असावे.
पगार : 21,700/- 69,100/-
निवड प्रक्रिया
सीआयएसएफ भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) / शारीरिक मानक चाचणी (पीएसटी) / दस्तऐवजीकरण / व्यापार चाचणी / लेखी चाचणी / वैद्यकीय परीक्षा यांचा समावेश असतो. लेखी परीक्षा ओएमआर म्हणजेच संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने होईल. परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी दोन्ही असेल. पात्रता प्रमाणपत्रे/कागदपत्रांची पडताळणी पीईटी/पीएसटी, कागदपत्रे आणि ट्रेड टेस्टच्या वेळी मूळ प्रतींसह केली जाईल.
किती परीक्षा शुल्क लागेल?
यूआर, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी आणि ईएसएम प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज कसा करावा
सर्वप्रथम CISF च्या अधिकृत वेबसाइट cisfrectt.cisf.gov.in वर जा.
होमपेजवरील नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा.
जनरेट केलेल्या लॉगिन क्रेडेन्शियल्सच्या मदतीने फॉर्म भरा.
यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शेवटी फी भरल्यानंतर अर्ज सादर करा.