जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२६ । केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून ज्यामुळे सिगारेट, तंबाखू या पदार्थांच्या किंमती वाढणार आहेत. केंद्राने १ फेब्रुवारी २०२६ पासून सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्यावर कर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि उपकर (सेस) लावण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्थ मंत्रालयाने ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री सिगारेट, पान मसाल्याच्या किंमती वाढणार असल्याची घोषणा केली. सिगारेट, पान मसाला हे पदार्थ ४० टक्क्यांपेक्षा जास्त जीएसटी दरात येतात. हे अतिरिक्त एक्साइज ड्युटीमध्ये येतात. यामुळेच सरकारे हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार सरकारने पॅकिंग स्वरुपात किंवा पॅक असणाऱ्या तंबाखू, गुटखा यासाठी केंद्रीय उत्पादन शुल्क कायदा कलम 3A अंतर्ग, त अधिसूचना जाहीर केली आहे.

सिगारेट महागणार

सिगारेटच्या लांबीनुसार त्याची किंमत वाढणार आहे. प्रति १००० सिगारेटच्या काड्यांवर २०५० ते ८५०० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. ४० टक्के जीएसटीदेखील आकारला जाणार आहे. यामुळे सिगारेटची किंमत दुप्पट होईल. सरकारला तंबाखू उत्पानदनावरील कर प्रणाली आणखी कडक करायची आहे.
एक सिगरेटची किंमत २.०५ ते ८.० रुपयांपर्यंत महाग होणार आहे. त्यामुळे १८ रुपयांना मिळणार सिगारेटची किंमत २१ किंवा त्यापेक्षा जास्त होईल. लांब आणि प्रिमियम सिगारेटवर एक्साइज ड्युटी वाढवण्यात आली आहे. प्रत्येक कंपनीच्या टॅक्स दरानुसार ही एक्साइज ड्युटी लादली जाणार आहे.








