जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२१ । चोपडा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने दोन दिवसांचा जनता कर्फ्यु लावला होता. परंतु विविध संघटनांनी तहसीलदारांना निवेदन देऊन जनता कर्फ्युत वाढ करण्याची मागणी केली. त्यानंतर चोपडा तालुक्यात २५ ते २८ मार्चदरम्यान पुन्हा चार दिवसाचा पुन्हा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. यात दि २५ व २६ रोजी किराणा दुकानांसाठी शिथिलता देण्यात आली आहे.
कोरोनाने महिन्याभरापासून थैमान घातले आहे. त्यावर उतारा म्हणून प्रशासनाने पुन्हा चार दिवसांनी जनता कर्फ्युत वाढ केली आहे.याचा परिणाम कोरोनाचा वाढत्या रुग्ण संख्येला पायबंद घालतांना दिसत आहे. पण एवढ्यावर न थांबता प्रशासनाकडून कोरोनाची मगर मिठी सोडविण्यासाठी पुन्हा २५ ते २८ मार्च असे चार दिवसाचा पुन्हा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे.
काय सुरु काय बंद असणार?
१) सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील.
२) किराणे दुकाने, Non-Essential इतर सर्व दुकाने बंद राहतील
३) किरकोळ भाजीपाला / फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील.
४) शैक्षणिक संस्था / शाळा / महाविद्यालय, खाजगी कार्यालय बंद राहतील.
५) हॉटेल / रेस्टॉरंट (होम डीलीव्हरी / पार्सल वगळता) बंद राहतील.
६) सभा / मेळावे / बैठका / धार्मिक स्थळे , सांस्कृतिक/ धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.
७) शॉपींग मॉल/मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलुन, लिकर शॉप बंद राहतील.
८) गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेषकगृहे, क्रिडास्पर्या, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.
९) पानटपरी, हातगाड्या, उधड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील.
वरीलप्रमाणे लागू करण्यात आलेल्या निबंधातून “दुध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार व सेवा, मेडीकल स्टोअर्स, अम्ब्युलन्स सेवा, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत घटक यांना सूट देण्यात आली आहे.
चार दिवसांच्या कर्फ्युत दोन दिवस किराणा दुकानांसाठी शिथिलता
चोपडा प्रशासनाकडून २५ ते २८ मार्च पर्यंत पुन्हा जनता कर्फ्यु घोषित करण्यात आला आहे. परंतु यात २५ व २६ या दोन दिवसांसाठी किराणा दुकानांना शिथिलता देण्यात आली असून सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे.