⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

मेघ दाटुनी येता … चिंब पावसाच्या कविता काव्य अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२४ । पावसाचे तुषार पडले की निसर्ग जसा चारी अंगांनी बहरून येतो, तसंच बहरतं ते कवी मन. त्यातून स्फुरते नवी कविता. या चिंब पाऊस कविताच्या माध्यमातून वर्षाऋतुचा आनंद साजरा करण्याकरिता गुरुवारी (दि.११) रोजी मेघ दाटुनी येता हा चिंब पावसाच्या काव्य अभिवाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आणि कान्ह ललित कला केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा काव्य अभिवाचनाचा कार्यक्रम गुरुवार दि. ११ जुलै रोजी दुपारी ०३:३० वाजता मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाच्या जुना कॉन्फरन्स हॉल येथे होणार आहे. या कार्यक्रमात मराठी साहित्यातील महत्वाच्या कवींच्या कवितांचे गायन व अभिवाचन केले जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे, केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. आर. बी ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन व निवेदन गणेश सूर्यवंशी, अभिवाचन डॉ. श्रद्धा पाटील व गायन प्रा. ईशा वडोदकर या करणार आहेत. तरी काव्य अभिवाचनाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.