मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन फिरवला आणि 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदुरबार दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या कामाच्या तत्परतेसाठी ओळखले जातात. “माझ्या खिशाला पेन असतो, आपलं चालतं फिरतं मंत्रालय आहे” असं मुख्यमंत्री सांगतात. त्याचीच प्रचिती आज पाहायला मिळाली. कारण भर कार्यक्रमात मंचावरुन फोन फिरवला आणि नंदुरबार नगर परिषदचा रखडलेला 7 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करुन दिला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नंदुरबार नगर परिषद नूतन इमारत उद्घाटन झालं. या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी पालकमंत्री विजय कुमार गावित, खासदार हिना गावित, खनिकर्म मंत्री दादा भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं भाषण सुरु होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंचावरुनच अधिकाऱ्यांना फोन लावून 7 कोटी 28 लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला.