⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेर | मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्यास सावदा येथे रासायनिक खतांचा रँक लावणार

मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्यास सावदा येथे रासायनिक खतांचा रँक लावणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । सावदा रेल्वे स्टेशन येथे मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्यास रासायनिक खतांचा रँक उतरवीणार असल्याची माहीती दि. ८ बुधवार रोजी महाराष्ट्र राज्य फर्टीलाईझर (माफदा) चे अध्यक्ष विनोद तराळ यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव  आकांक्षा गोडावुन येथे झालेल्या बैठकीत देण्यात आली. 

या बैठकीत  रासायनिक खतांचे काही विक्रेते ,रासायनिक खत कंपन्यांचे प्रतीनिधी, ट्रान्सपोर्ट चालक प्रतीनिधी जिल्हा कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, माफदा चे उपाध्यक्ष कैलास मालु जिल्हा मोहिम अधिकारी महाजन, जिल्हा डिलर्स असोशियन चे अध्यक्ष राजु पाटील सुनिल कोंडे शासनाच्या नियमांचे पालन करत उपस्थित होते.

सावदा येथे रासायनिक खतांचा अर्धा रँक मंजुर असुन,विक्रेते व वितरक यांनी रँक उतरविण्यासाठी सहमती दर्शवली असली तरी मात्र सावदा रेल्वे स्टेशन येथे मुलभुत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रासायनिक खते निर्मिती कंपनीच्या प्रतीनिधी अनुकूल नसल्याची माहीती समोर आली आहे. सावदा येथील रँकसाठी शेतकऱ्यांना अजुन काही काळ वाट बघावी लागेल. सर्व रासायनिक निर्मिती कंपन्या या केंद्राची संलग्न असतात कोणत्या जिल्ह्याला किती खत द्यायचं हे केंद्र सरकार ठरवित असते. त्यामुळे खासदार यांनी माहीती घेऊन विक्रेत्यावर व वितरकांवर बोट ठेवण्यापेक्षा सावदा रेल्वेस्टेशन येथील मालधक्क्यावर मुलभुत सुविधांवर भर दिली तर शेतकऱ्यांचा कायमचा प्रश्न मिटेल.

सावदा येथील शेड भंगारात

सावदा रेल्वे स्टेशन येथे रासायनिक खतांचा मालधक्का मंजुर झाल्यानंतर अवघ्या महीन्याभरात येथील शेड भंगार मधे काढण्यात आला होता.तो अद्यापही नव्याने तयार करण्यात आलेला नाही. येथे शेड नाही. त्यामुळे रासायनिक खतांच्या गोण्या ठेवायच्या  कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सावदा रेल्वे स्टेशन येथे गोडाऊन नाही

रेल्वेने दिलेल्या कालावधित रेल्वे डबे खाली न केल्यास कंपन्याना अधिकचे पैसे मोजावे लागतात. सावदा रेल्वे स्टेशन येथे अर्धा रँक  म्हणजे बीसीएन दर्जा चे  माल वाहतुक रेल्वे 21 डबे मंजुर  आहे.एका डब्यात 1280 गोण्या बसतात म्हणजे २१ डब्यात  २६८८०   गोण्या बसतात. एका दिवसात एवढ्या मालाची वाहतुक शक्य नाही.येथे गोडावुन नसल्याने  येवढ खत उतरवील्यावर ते ठेवायच कुठ  अशा दुहेरी संकटात खत कंपन्या सापडल्या आहे.

सावदा रेल्वे स्टेशन येथे रासायनिक खते उतरविण्यासाठी ज्या मुलभुत सोई सुविधा लागतात.त्यांचा,अभाव असुन त्या सोडविण्यात याव्या. जेनेकरुन कंपन्या रँक उतरून शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळतील.

-विनोद तराळ
अध्यक्ष- माफदा,महाराष्ट्र राज्य

मागिल वर्षी खतांचा तुडवडा निर्माण झाला होता. त्यामुळेच आ.शिरीष चौधरी व मी ना.गुलाबराव पाटील यांचे माध्यमातून जिल्हाअधिकारी यांचे कडुन सावदा येथे रँक पाँईट मंजुर करुन घेतला होता.  सावदा येथे  रँक  पाँईट  लवकरात लवकर सुरु होण्यासाठी जिल्हाअधिकारी यांना पुन्हा पत्र व्यवहार केला आहे. रँक पाईट सुरु होईल तोपर्यंत पाठपुरावा करत राहु

आ.चंद्रकांत पाटील
आमदार, मुक्ताईनगर

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.