चिअर्स : चोरट्यांनी ‘खान्देश’ बार फोडला, दारूसह हजारोंच्या मालावर साधला डाव!

ऑगस्ट 10, 2022 11:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत असलेल्या हॉटेल खान्देश बार अज्ञात चोरडाने फोडल्याची घटना ८ रोजी घडली. यात दारूसह सुमारे हजारोंचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime yawal jpg webp

संतोष दामोदर वंजारी यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. वंजारी यांचे एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर ‘खान्देश’ नावाचे परमिट बार आहे. यात अज्ञात चोरट्यांनी ८ रोजी मध्यरात्री डाव साधला. दरम्यान, 18 हजार रुपये रोकड, टीव्ही, सीसीटीव्ही, डिव्हाईस, विदेशी दारू असे चोरून नेले. हॉटेलचे मालक संतोष दामोदर वंजारी हे रात्री बारा वाजता हॉटेल बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी ९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ते हॉटेलमध्ये आले असता त्यांना दरवाजा उघडा दिसला व चोरी झाल्याचे आढळून आले. त्यांनी पोलिसांना कळविले, पोलीसानी घटनास्थळी भेट दिली व चोरीची माहिती घेतली.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now