गुन्हेजळगाव शहर

माहेरून पैसे आणले नाहीतर जिवंत जाळण्याची धमकी, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२१ । दुकान घेण्यासाठी माहेराहून २५ लाख रुपये आणावे, अशी मागणी करीत एका विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून ठार मारण्याचा धमकी दिली. याप्रकरणी पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव येथील ममाहेर असलेल्या राखी राजेश तलरेजा (वय ३८, रा. गणेशनगर) यांचा विवाह मलकापूर (ता. बुलडाणा) येथील राजेश रामचंद तलरेजा यांच्याशी (वर्ष २०१२) मध्ये रितीरिवाजानुसार झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती राजेश तलरेजा याने दुकान घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्याने विवाहितेला चटके देण्यास सुरवात केली. पैसे आणले नाही तर अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळून टाकण्याची धमकी दिली.

जिल्हापेठ पोलीसात तक्रार
पतीचे मोठे तीन भाऊ, पुतण्या आणि चुलत जेठ यांनी देखील मारहाण केली. यात विवाहितेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता जळगाव येथील माहेरी निघून आल्या. छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली.
यांच्यावर गुन्हा दाखल

त्यांच्या तक्रारीवरून पती राजेश रामचंद्र तलरेजा, जेठ अमर तलरेजा, विनोद तलरेजा, मुकेश तलरेजा, पुतण्या अजय मुकेश तलरेजा सर्व (रा. छोटी सिंधी कॉलनी वाटर सप्लाय, कंवर नगर, मलकापूर जि. बुलडाणा) आणि चुलत जेठ सुभाष तलरेजा (रा. बुलडाणा) यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button