भुसावळ : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण पूर्व रेल्वेकडून हावडा स्थानकावरील लिंक केबिनसाठी नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येणार असल्याने २४ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही प्रमुख मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रारंभ व समाप्ती (टर्मिनल) स्थानकांमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करावा.

बदल करण्यात आलेल्या गाड्या
क्र. १२८३४ हावडा – अहमदाबाद एक्स्प्रेस : २४ व २५ जुलै रोजी हावडाऐवजी शालिमार स्थानकावरून सुटेल.
क्र. १२८५९ सीएसएमटी – हावडा गीतांजली एक्स्प्रेस : २४ व २५ जुलै रोजी सांतरागाछी स्थानकापर्यंतच धावेल.
क्र. १२८६० हावडा – सीएसएमटी गीतांजली एक्स्प्रेस : २५ व २६ जुलै रोजी हावडाऐवजी सांतरागाछी स्थानकावरून नियोजित वेळेनुसार सुटेल.
क्र. १२८०९ सीएसएमटी – हावडा मेल एक्स्प्रेस : २४ जुलै रोजी सांतरागाछी स्थानकापर्यंतच धावेल.
क्र. १२८१० हावडा – सीएसएमटी मेल एक्स्प्रेस : २५ व २६ जुलै रोजी हावडाऐवजी सांतरागाछी स्थानकावरून सुटेल.
क्र. २२८९३ साईनगर शिर्डी – हावडा एक्स्प्रेस : २५ जुलै रोजी सांतरागाछी स्थानकापर्यंतच धावणार आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, संबंधित गाडीच्या वेळा व टर्मिनलमधील बदल लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, जेणेकरून कोणतीही गैरसोय होणार नाही.









