यावल शहरात सार्वजनिक पाण्याची वेळ बदला
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरात सार्वजनिक पाणी पुरवठा रात्री तीन वाजता सोडण्यात येत असून यात बदल करावा. या मागणीसाठी १२ वाजता येथील नागरिकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत धडक दिली. दरम्यान नागरिकांनी अधिकारी कर्मचार्यांना वेठीस धरले होते.
याबाबत मनसेने यापूर्वी देखील निवेदन दिले होते. त्यावर तोडगा न निघाल्यामुळे संतप्त नागरिकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाचे दादू धोत्रे, अभियंता एस.ए.शेख यांना जाब विचारण्यासाठी नगरपालिकेत १२ वाजेपासून प्रचंड मोठ्या प्रमाणावर वेठीस धरले. नगरपालिकेने उत्तर द्यावे अन्यथा नागरीक न्यायालयात धाव घेतील असा इशारा देण्यात आला आहे.
गरपालिकेत आंदोलक महिला व नागरिकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर घारू, तालुका अध्यक्ष जुगल पाटील, शहराध्यक्ष आकाश चोपडे, तालुका उपाध्यक्ष गणेश येवले, शहर उपाध्यक्ष दुर्गेश कोळी, विद्यार्थी सेनाध्यक्ष विपुल येवले, काऊ घारू, गणेश येवले, तुषार गजरे, कुणाल गजरे, भावेश तायडे, सावंत जाधव, जयेश सुरवाडे, महेश घारू, जतीन घारू आदी उपस्थित होते.