⁠ 
शनिवार, मे 4, 2024

सावद्यात कोव्हेक्सीनची लस उपलब्ध करून देणार ; आ चंद्रकांत पाटलांची पदाधिकाऱ्यांना ग्वाही

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । सावदा येथे  लसीकरण सुरू झालें तेव्हापासून नागरिकांना कोव्हेक्सीन ही लस देण्यात आली. आता याच नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध होत नसल्याने त्यांना सदर दुसरा डोस त्वरीत उपलब्ध करून देण्याची मागणी सावदा शिवसेना उप तालुका  प्रमुख लाला चौधरी व माजी नगरसेवक शाम पाटील  यांनी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना दि ७ रोजी संध्याकाळी भ्रमणध्वनीद्वारे  केली.

तक्रारीची दखल घेत लगेच आमदार पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी बोलणे केले असता  त्यांनी येत्या सोमवार पर्यंत  को व्हाक्सीन ही लस येथे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

सावदा येथे प्रथम “कोव्हेक्सीन” घेणाऱ्या नागरिकांना प्रथम डोस घेऊन जवळपास ४० ते ५० दिवस वर झाले. असून त्यांना आता कोव्हेक्सीन चा दुसरा डोस घेणे अनिवार्य झाले असताना सदर लस येथे उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची चांगलीच वणवण होत आहे. अनेक दुसऱ्या ठिकाणी किंवा खाजगी रुग्णालयात देखील ती उपलब्ध होत नसल्याने आता या नागरिकांना चिंता  वाढली होती जर दुसरा डोस वेळेत मिळाला नाही. तर आता पुढे काय करावे ही देखील चिंता लागून होती , येथील ग्रामीण रुग्णालयात तपास केला असता वरून जी लस येईल ती आपण देतो आम्हाला कोणती लस हवी ती मागणी करता येत नाही असे समजले त्या मुळे आता कोव्हेक्सीन च्या दुसऱ्या डोस साठी नागरिकांना आता मात्र पर्याय सापडत नसल्याचे चित्र सध्या शहरात  नागरिकांना होते.

कोव्हेक्सीन च्या दुसरा डोस मिळेल या आशेने दररोज नागरिक सकाळ पासून येथील लसीकरण केंद्रावर गर्दी करतात मात्र सदर लस उपलब्ध नसल्याचे समजताच त्यांना परत माघारी फिरावे लागते हा प्रकार सुमारे १० ते १२  दिवसा पासून सुरू आहे याच सर्व प्रश्ना बाबत अनेक नागरिकांनी शिवसेना पदाधिकारी यांचे कडे तक्रार केल्यावर लागलीच  शिवसेना उप तालुका प्रमुख  लाला चौधरी व माजी नगरसेवक शाम पाटील  यांनी तात्काळ  मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनात ही बाब लक्षात आणून देताच त्यांनी लगेच  जिल्हावैद्यकीय अधिकारी श्री चव्हाण  याबाबत फोन वरून संपर्क साधला व सदर नागरिकांची कैफियत मांडली व त्वरित येथे कोव्हेक्सीन ही लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली ,यावेळी जिल्हावैद्यकीय अधिकारी यांनी  सावदा ग्रामीण रुग्णालयात  येथे येत्या सोमवार पर्यंत   कोव्हेक्सीन लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून हा दुसरा डोस उपलब्ध झाल्यास सदर नागरिकांचे व्हेकसिनेशन देखील पूर्ण होणार आहे.