शिंदे गटाच्या आमदाराने काढली एकनाथ खडसेंची औकात ; म्हणाले..

मार्च 5, 2024 12:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 5 मार्च 2024 । शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत त्यांची थेट औकात काय? असा प्रश्न विचारला आहे.

khadse jpg webp

खरंतर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे ते सुलवाडी रावेरला जोडणाऱ्या महत्त्वकांशी पुलाचे भूमिपूजन पार पडले. यातच विकास कामांवरून आमदार चंद्रकांत पाटील यांनी “एकनाथ खडसेंची औकात काय? यांची लायकी काय? मी मरेपर्यंत माझी कुस्ती यांच्यासोबत सुरू ठेवील”, अशा शब्दांत निशाणा साधला.

“मुक्ताईनगर मतदारसंघात साप सोडणारे खूप आहेत. 30 वर्षांत मतदारसंघात यांनी काहीच केलं नाही. काहींना वाटतं की, हा महत्त्वाचा रावेरला जोडणारा पूल होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय साहेब आपण याकडे लक्ष द्यावं. केळी पिक विमाबाबत महाभागांनी संभ्रम निर्माण करून शेतकऱ्यांना वंचित ठेवलं”, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.

दरम्यान, “या कार्यक्रमासाठी आरोग्य सेविकांना 50 रुपये देऊन बोलावलं गेल्याचा आरोप केला गेला. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की उपस्थित एकाने तरी तसं सांगून दाखवावं.या कार्यक्रमाला निस्वार्थीपणे सर्व जमा झाले आहेत”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा साधला.

रक्षा खडसे यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती
दरम्यान, रावेर लोकसभेच्या विद्यमान भाजपच्या खासदार रक्षा खडसे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या. विशेष म्हणजे रक्षा खडसे यांचं नाव देखील पत्रिकेत नव्हतं. मात्र भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुक्ताईनगर मतदारसंघात 250 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन झालं.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now