चंद्रकांत पाटलांनी आत्ताच निवृत्ती घ्यावी, एकनाथराव खडसेंचा टोला
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही, ते विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते. त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध कधीच नव्हता उलट पक्षाने त्यांना गेल्या काही काळात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र आता पक्षातले वातावरण त्यांना आवडत नसावे, या वातावरणात पुढच्या काळात राजकारण अवघड आहे असे त्यांना वाटत असावे म्हणून राजकारणापासून वेगळे होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल असे एकनाथराव खडसे म्हणाले.
‘पाच, दहा वर्षे कशाला पाहिजे? आताच घ्या ना,’ अशा शब्दांत आ एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. यावेळी खडसे म्हणाले कि, चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही, ते विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते. त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध कधीच नव्हता उलट पक्षाने त्यांना गेल्या काही काळात मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र आता पक्षातले वातावरण त्यांना आवडत नसावे, या वातावरणात पुढच्या काळात राजकारण अवघड आहे असे त्यांना वाटत असावे म्हणून राजकारणापासून वेगळे होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल
याच बरोबर रक्ताचे नाते कधी संपत नसतात, असे मत भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत व्यक्त केले होते. यावर बोलताना खडसे म्हणाले की, ‘पंकजा मुंडे यांनी काही तरी वक्तव्य केले म्हणून सुतावरून स्वर्ग गाठण्याची गरज नाही.