
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसापासून थंडीचा कडाका वाढलेला होता. परंतु आज शनिवारी सकाळपासून थंडी तीव्रता कमी जाणवू लागली. तसेच आज दुपारनंतर ढगाळ वातावरणात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. एकीकडे थंडीचा जोर वाढलेला असतानाच राज्यात पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आज दि. २२ जानेवारीला पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच रविवारनंतर पुढील ३ ते ४ दिवस जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी किमान तापमान १३.४ अंशावर तर कमाल तापमान ३० अंशावर हाेते. पहाटेच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी १३ किलाेमीटरपर्यंत वाढलेला हाेता. शनिवारी देखील वाऱ्याचा वेग ताशी १३ ते १४ किलाेमीटरपर्यंत राहणार आहे. तर किमान तापमानात ६ ते ७ अंशापर्यंत घट हाेऊ शकते. रविवार ते बुधवारपर्यंत जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात घट हाेणार असल्याने या काळात गारठा वाढणार आहे. उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता वाढणार आहे. दरम्यान, राज्यात पुढील आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
हे देखील वाचा :
- हतनूरचा विसर्ग पूर्णपणे बंद; धरणातील जलसाठा ‘इतक्या’ टक्क्यांवर
- जळगावच्या ताफ्यात ७ नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
- उत्पादन भरघोस, दर मात्र कवडीमोल! चाळीसगावातील शेतकऱ्याने उभ्या वांग्यावर फिरवला ट्रॅक्टर
- जळगावात ‘रोजगार महाकुंभ’; उद्या २३ ठिकाणी मेळावे, 1250 हून अधिक नोकऱ्यांची संधी
- सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला





