---Advertisement---
जळगाव जिल्हा

IMD Alert : पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधारची शक्यता ; जळगावला ‘या’ तारखेपर्यंत अलर्ट..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२३ । गेल्या महिन्यात राज्यातील अनेक भागात धोधो पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती तर अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आले आहे. काही ठिकाणी पावसाने म्हणावी तशी हजेरी लावली नाहीय यामुळे पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, जुलैनंतर आता ऑगस्टमध्ये पाऊस कसा असेल याकडे लक्ष लागले आहे.

rain 4 jpg webp webp

यातच बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाला असून यामुळे राज्यात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आयएमडीचे प्रमुख डॉ. के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करून पुढील ४,५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, आज राज्यातील २१ जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्याला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

---Advertisement---

आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील २१ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

जळगाव ३ तारखेपर्यंत अलर्ट जारी?
दरम्यान, राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून यात जळगाव जिल्ह्याला गुरुवार पर्यंत (३ ऑगस्ट) पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट महिना खरिप पिकांच्या दृष्टीने महत्वाचा असतो. मात्र ऑगस्ट महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील बऱ्याच भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिना शेतकऱ्यांची चिंता वाढणारा ठरु शकतो.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---