जळगाव लाईव्ह न्युज | २५ एप्रिल २०२२ । तालुक्यातील असोदा येथील आव्हाने रोड वरील वीट भट्टी जवळ जुगार खेळणाऱ्या ७ ते ८ जणांवर तालुका पोलिसांनी कारवाई करून संशयितांना ताब्यात घेत सुमारे १ लाख ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जागेवरून हस्तगत केला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसोदा येथील आव्हाने रोडवर असलेल्या वीट भट्टीजवळ मोकळ्या जागेत सात ते आठ जण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दिनांक २४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलिसांनी घटना स्थळावर जात छापा टाकून संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडील रोख रक्कम व दुचाकी असा एकूण १ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यासंदर्भात पोलिस नाईक ज्ञानेश्वर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत नुसार संशयितांवर मुंबई जुगार कायदा कलम १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री.पवार यांच्या सह पोना. रविंद्र मोतीराया, पोकॉ. अशोक भुसे, पोकॉ.आकाश शिंपी, पोकॉ.आकाश माळी, पोकॉ. संतोष जाधव, पोकॉ.जीवन जाधव, पोकॉ.रवींद्र सरकार, यांच्या पथकाने ही कारवाई केली.