चाळीसगावजळगाव जिल्हा
20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चाळीसगावच्या सुपुत्राची निवड; आ. मंगेश चव्हाण यांनी केला सत्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । 20वी आशियाई क्रीडा स्पर्धा दमाम सौदी अरेबिया येथे दि.18 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 रोजी दरम्यान पार पडली. या स्पर्धेसाठी चाळीसगावचे सुपुत्र व सध्या भारतीय वायुसेनेत हवालदार या पदावर कार्यरत असलेले भूषण ज्योतीराम शिंदे याची निवड झाली. यानिमित्ताने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा घरी भूषण शिंदे व सर्व मित्र परिवार यांनी आमदारांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी भूषणचे कौतुक केले. तसेच त्याचा सत्कार करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुनील राजपूत, संजय सोनार, धनंजय मराठे, धर्मा मराठे, अजित राजपूत, परेश पवार, शुभम पाटील, कल्पेश चौधरी, गौरव गवळी, दिपक निकुंभ,आचू गवळी, धीरज पवार, अमोल गवळी उपस्थित होते.