चाळीसगाव : दोन लाख रुपयांची रोकड हिसकावून चोरटे फरार

ऑगस्ट 5, 2023 12:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज| ५ ऑगस्ट २०२३। शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत पैशांचा भरणा करण्याकरता आलेल्या ग्राहकाच्या हातातील दोन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी दुचाकीवरून आलेल्या चार भामट्यांनी जबरदस्तीने हिसकावून पळ काढण्याची घटना चार जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

jalgaon mahanagar palika 37 jpg webp

सूत्रांनुसार, तालुक्यातील देवळी येथील पैठणी व्यावसायिक असलेले माधव पद्माकर रणदिवे वय ४० हे चार जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत पैशांचा भरणा करण्याकरिता आले असता या ठिकाणी दोन मोटरसायकल वरील चार इसमाने त्यांच्या हातातील दोन लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून पोबारा केला.

या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपने विशाल टकले करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now