⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

चाळीसगाव तालुक्यातील या गावांना मिळणार 100 कोटींची विकास कामे

जळगाव लाईव्ह न्यूज | 11 मार्च 2023 | महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यातील रस्ते विकास कामांसाठी १०० कोटींच्या निधीची भरघोस तरतूद करण्यात आली आहे. अनेक दशके दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या व जनतेची मोठ्या प्रमाणावर मागणी असणाऱ्या रस्त्यांची आता दुरुस्ती होणार आहे. चाळीसगाव मतदारसंघातील रस्त्यांना १०० कोटींचा निधी मंजूर झाल्याने ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा बॅकलॉग भरून निघणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.

अर्थसंकल्प २०२३ मध्ये मंजूर झालेले रस्ते पुढीलप्रमाणे :

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारे रस्ते (राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आदी)

1 टाकळी प्र.दे. ते देखमुखवाडी विशेष दुरुस्ती करणे – २ कोटी ५० लक्ष
2 सायगांव – नांद्रे – काकडणे ते फाटा रस्ता सुधारणा करणे – ३ कोटी ५० लक्ष
3 मेहुणबारे ते शिदवाडी रस्ता सुधारणा करणे – २ कोटी
4 आडगाव ते उंबरखेड रस्ता रुंदीकरण करणे – २ कोटी
5 तळोंदे प्र चा आश्रम शाळे जवळ पुलांचे जोड़ रस्त्या सह बांधकाम करणे ता. चाळीसगाव जि. जळगाव – १ कोटी ७० लक्ष
6 लोंढे कृष्णापुरी ते वरखेड रस्ता सुधारणा करणे – ३ कोटी ५० लक्ष
7 वालझिरी फाटा ते पिंपरखेड रस्ता सुधारणा करणे – २ कोटी
8 वडाळा ते हिंगोणे सिम रस्ता सुधारणा करणे – २ कोटी
9 देवळी ते भोरस रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष
10 रामा-384 पिंपरखेड आश्रम शाळा ते शामवाडी रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष
11 माळशेवगे शेवरी ते हिरापुर रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष
12 नागद रस्ता ते चांभार्डी फाटा रस्ता सुधारणा करणे – २ कोटी
13 डोणदिगर बेघर वस्तीजवळ पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम करणे – ५० लक्ष
14 पोहरे गावातील लांबीत वळण रस्ता रस्ता सुधारणा करणे – ६ कोटी
15 शिदवाडी ते पोहरे व कळमडु ते जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करणे – २ कोटी – ५० लक्ष
16 गणपूर ते वालझिरी फाटा रस्ता सुधारणा करणे २ कोटी

17 बोरखेडा ते रहीपुरी दरम्यान स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे रस्ता सुधारणा करणे – १ कोटी
18 रामा-24 ते चांभार्डी रस्ता सुधारणा करणे २ कोटी ५० लक्ष
19 – रामा-25 ते रामनगर रस्ता सुधारणा करणे – ३ कोटी
20 दस्केबर्डी ते खेडी रस्ता सुधारणा करणे – १ कोटी ५० लक्ष
21 कळमडु गावाजवळ पोहरे रस्त्याला संरक्षक भिंतीचे बांधकामसह सुधारणा करणे – १ कोटी
22 ब्राम्हणशेवगे ते देवळी रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष
23 अंधारी ते शेवरी रस्ता सुधारणा करणे २ कोटी ५० लक्ष
24 पोहरे गावाजवळ संरक्षक भिंतीचे व जलनिस्सारणाचे कामासह सुधारणा करणे – ८० लक्ष
25 प्रजिमा-43 ते माळशेवगा रस्ता सुधारणा करणे – २ कोटी ५० लक्ष
26 भाग- बोरखेडा ते ढोमणे फाटा रस्ता सुधारणा करणे – २ कोटी
27 खेडगाव गुढे दरम्यान कॅनॉल वरील पुलाचे जोडरस्त्यासह पुनर्बांधकाम करणे – ७० लक्ष
28 पिंजारपांडे लोंढे चिंचगव्हाण खडकीसिम धामणगांव रस्ता प्रजिमा-66 कि मी 2/100 येथे पुलांचे जोड़ रस्त्या सह बांधकाम करणे – ७२ लक्ष
29 पिंप्री चौफुली ते माळशेवगे दरम्यान कॅनॉल वरील पुलाचे जोड़ रस्त्या सह बांधकाम करणे – ६० लक्ष
30 चंडिकावाटी फाटा ते शिवापुर दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण व ठिकठिकाणी संरक्षक भिंत बांधणेसह सुधारणा करणे – २ कोटी
31 ओढरे ते पाटणे दरम्यान पुलांचे जोड़रस्त्या सह बांधकाम करणे – २ कोटी ५० लक्ष
32 घोडेगाव, ओढरे ते पाटणे दरम्यान येथे ठिकठिकाणी संरक्षक भिंत बांधणे – १ कोटी ८० लक्ष

एकूण – ६८ कोटी

जिल्हा परिषद अंतर्गत असलेले ग्रामीण मार्ग (ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग)

1 – दहिवद ते धामणगांव रस्ता ग्रा.मा.-34 कि.मी. 0/00 ते 5/00 ची सुधारणा करणे – २ कोटी
2 – करगांव ते खरजई रस्ता ग्रा.मा.-44 कि.मी. 0/00 ते 5/00 ची सुधारणा करणे – १ कोटी ५० लक्ष
3 – ब्राम्हणशेवगे ते माळशेवगे रस्ता ग्रा.मा.- 59 कि.मी.0/00 ते 1/00 ची सुधारणा करणे – ५० लक्ष
4 – हिरापूर ते तांबोळे रस्ता ग्रा.मा.- 86 कि.मी.0/00 ते 1/00 ची सुधारणा करणे – ४० लक्ष
5 – कळमडू ते शिदवाडी रस्ता ग्रा.मा.- 92 कि.मी.0/600 ते 8/00 ची सुधारणा करणे – २ कोटी
6 – सांगवी ते बोढरे रस्ता ग्रा.मा.- 93 कि.मी.0/00 ते 2/500 ची सुधारणा करणे – १ कोटी
7 – गुजरदरी ते जिल्हा हद्द रस्ता ग्रा.मा.-129 कि.मी.0/00 ते 1/250 ची सुधारणा करणे – ५० लक्ष
8 – प्रजिमा ४५ ते अभोणे तांडा रस्ता ग्रा.मा.45 किमी 0/00 ते 1/00 ची सुधारणा करणे – ५० लक्ष
9 – पिपळवाड म्हाळसा ते आडगांव रस्ता ग्रा.मा.-187 कि.मी.0/00 ते 3/00 ची सुधारणा करणे – १ कोटी २० लक्ष
10 – लोंजे ते शिव तांडा जिल्हा हद्द रस्ता ग्रा.मा.-198 कि.मी.0/00 ते 3/00 ची सुधारणा करणे – १ कोटी
11 – खडकीसिम ते तिरपोळे ते रा.मा.-25 रस्ता इजिमा-66 कि.मी. 1/400 ते 3/00 ची सुधारणा करणे – ८० लक्ष
12 – बेलदारवाडी ते शामवाडी रस्ता इजिमा – 67 कि.मी. 0/00 ते 2/00 ची सुधारणा करणे – ९० लक्ष
13 – बाणगाव ते बाणगाव फाटा रस्ता इजिमा – 71 कि.मी. 0/800 ते 1/500 ची सुधारणा करणे – ४० लक्ष
14 अलवाडी ते शिरसगाव रस्ता इजिमा-67 कि.मी. 0/00 ते 0/700 ची सुधारणा करणे – ३५ लक्ष
15 – पळासरे तिरपोळे रस्ता ग्रा.मा.-196 कि.मी.0/00 ते 3/00 ची सुधारणा करणे – १ कोटी १० लक्ष
16 – भवाळी ते रामा- 8 ला मिळणारा रस्ता ग्रा.मा.-3 कि.मी.0/00 ते 1/500 ची सुधारणा करणे – ५० लक्ष

17 – पिलखोड देशमुखवाडी ते सायगांव रस्ता ग्रा.मा.-15 कि.मी.0/00 ते 1/500 ची सुधारणा करणे – ६० लक्ष
18 – देवळी ते उंबरखेड मार्ग रस्ता ग्रा.मा.-51 कि.मी. 4/00 ते 5/00 ची सुधारणा करणे – ४५ लक्ष
19 – मालशेवगे ते तमगव्हाण मार्ग रस्ता ग्रा.मा.-29 कि.मी.0/00 ते 4/500 ची सुधारणा करणे – १ कोटी ५० लक्ष
20 – उंबरखेडे पिंप्री भोरस फाटा मार्ग रस्ता ग्रा.मा.-52 कि.मी.0/00 ते 3/300 वर कोरडी नाल्यावर संरक्षण भिंतीसह सुधारणा करणे – २ कोटी २० लक्ष
21 – तळेगांव ते पिंप्री बु प्र चा मार्ग रस्ता ग्रा.मा.-99 कि.मी.0/00 ते 3/00 ची सुधारणा करणे – १ कोटी ८० लक्ष
22 – पळासरे फाटा ते पळासरे (वरखेडे ) रस्ता ग्रा.मा.-27 कि.मी.0/00 ते 2/300 ची सुधारणा करणे – १ कोटी
23 – जुनोने ते प्ररामा-211 ला मिळणारा मार्ग रस्ता ग्रा.मा.-18 कि.मी.0/00 ते 2/00 ची सुधारणा करणे – ८५ लक्ष
24 – लोंढे ते जिल्हा हद्य (तरवाडे वाडे) रस्ता ग्रा.मा.-90 कि.मी.0/00 ते 3/00 ची सुधारणा करणे – १ कोटी २० लक्ष
25 – पळासरे चिंचगव्हाण रस्ता ग्रा.मा.- 6 कि.मी.0/00 ते 4/00 ची सुधारणा करणे – १ कोटी ४० लक्ष
26 – पिंपळगांव राजदेहरे जुनपाणी मार्ग रस्ता ग्रा.मा.-21 कि.मी.0/00 ते 3/00 ची सुधारणा करणे – ९० लक्ष
27 – मुंदखेडा खु. ते वाघळी रस्ता रस्ता ग्रा.मा.-157 कि.मी.0/00 ते 1/00 ची सुधारणा करणे – ४५ लक्ष
28 – कुंझर ते शिरुड रस्ता रस्ता ग्रा.मा.-138 कि.मी.0/00 ते 4/00 ची सुधारणा करणे – १ कोटी ८० लक्ष
29 – लोजे ते सांगवी रस्ता रस्ता ग्रा.मा.-153 कि.मी.0/00 ते 3/00 ची सुधारणा करणे – १ कोटी २० लक्ष
30 – वाघळी ते डामरुण रस्ता ग्रा.मा.- कि.मी.0/00 ते 1/500 ची सुधारणा करणे – ५० लक्ष
31- घोडेगाव ते करजगाव रस्ता इजिमा-68 कि.मी. 0/00 ते 0/500 ची सुधारणा करणे – २२.५ लक्ष