⁠ 
सोमवार, मे 6, 2024

चाळीसगाव पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला मान्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । चाळीसगाव पंचायत समितीच्या नवीन सर्व सुविधांनी युक्त प्रशासकीय इमारत बांधकामासाठी 9 कोटी 50 लाख रुपयाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

1 मे 1961 ला महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात झाल्यानंतर चाळीसगावला पंचायत समितीचे कामकाज एका लहानशा इमारतीत सुरू झाले. त्यानंतर वर्षानुवर्षे पंचायत समितीच्या कार्याचा कामकाजाचा विस्तार होत गेला. परंतु अपुऱ्या इमारतीमुळे सर्व विभाग एकाच छताखाली आणता येत नव्हते. या सर्व बाबींचा विचार करून सभापती अजय पाटील यांनी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन इमारतीसाठी विविध स्तरावर मागील दोन वर्षापासून सतत पाठपुरावा केला. पंचायत समितीला स्वतःच्या मालकीची जागा नसल्यामुळे बरेच वर्ष इमारत मंजूर होण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे चाळीसगाव न्यायालया शेजारची साडेचार हजार चौरस मीटर इतकी जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळवून दिली.

या इमारतीची संरचना औरंगाबाद येथील वास्तु शाळेत कार्यालयाची मान्यता घेण्यात आली होती. इमारतीमध्ये पंचायत समितीचे विविध 16 विभाग कार्यरत असणार आहेत. शिवाय एक सुसज्ज सभागृह, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉल, गट विकास अधिकारी सभापती यांच्यासाठी उत्कृष्ट दालन, सौर ऊर्जा ची व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फर्निचर, संरक्षण भिंत अशा सर्व बाबींचा समावेश या अंदाजपत्रकात केला आहे. या इमारतीसाठी माजी आमदार राजीव देशमुख यांनी दि. 26/05/2021 रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांंचेेकडे लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. सर्व सुविधायुक्त सुसज्य अशा या प्रशासकीय इमारती च्या प्रस्तावला ना. हसन मुश्रीफ मंत्री ग्रामविकास, ना.अब्दुल सत्तार यांनी मान्यता दिली आहे. याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार, ना.जयंत पाटील, ना.गुलाब पाटील पालक मंत्री जळगाव, गुलाबराव देवकर, एकनाथजी खडसे, आमदार कुणाल पाटील, खा.उन्मेष पाटील, अप्पर सचिव प्रशांत पाटील यांचे सहकार्य लाभले.

नवीन प्रशासकीय इमारतच्या मान्यतेसाठी, उपसभापती सुनील पाटील, जीभाऊ पाटील, भाऊसाहेब केदार, शिवाजी सोनवणे, विष्णू चकोर, बाजीराव दौंड, सुनील पाटील, समिती सदस्य, सदस्या यांचे सहकार्य लाभले. याकामी शशी साळुंखे, प्रमोद बापू, पाटील, कैलास सूर्यवंशी, भगवान पाटील, रामचंद्र जाधव, शाम देशमुख, दिनेश पाटील, दिपक पाटील, अतुल पाटील देवळी, दिपक कछवा आदींनी सहकार्य केले.