⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | गुन्हे | चाळीसगाव हादरले! चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीची हत्या करून पतीनेही संपविले जीवन

चाळीसगाव हादरले! चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीची हत्या करून पतीनेही संपविले जीवन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२४ । चाळीसगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून करत पतीने ही गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना तळोंदे प्र.दे.(ता. चाळीसगाव) येथे घडली आहे. लक्ष्मीबाई (२६) व गोपाल पावरा उर्फ बारेला (३०) असे मयत पती-पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तळोंदे प्र.दे. शिवारातील शिवाजी पाटील (रा. पिंप्री बुटूक प्र.दे.) यांच्या शेतातील खोलीत गोपाल पावरा उर्फ बारेला हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तर, लक्ष्मीबाई हिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिचा दोरीने गळा आवळल्याने तिचासुद्धा मृत्यू झाल्याचे आढळले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे, उपनिरीक्षक विकास शिरोळे, पो.ना. प्रकाश कोळी, नंदकिशोर महाजन, हनुमंत वाघेरे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, पत्नी लक्ष्मीबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करून तिला मारून टाकण्याची धमकी गोपाल हा नेहमी द्यायचा. याच कारणावरून त्याने लक्ष्मीबाईची हत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात मयत गोपाल पावरा याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.