एसटी भाडेवाढीविरोधात जळगावात ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन

जानेवारी 28, 2025 5:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२५ । एसटी महामंडळाने नुकतीच एसटी तिकीटात दरवाढीची घोषणा केली. तिकीट दरात तब्बल १५ टक्क्यांची वाढ झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. यातच एसटीच्या केलेल्या भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गटाने जळगावमधील नवीन बस स्थानक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

chakka jam

राज्य शासनाने परिवहन महामंडळाच्या प्रवासी वाहतूक भाडेवाडी विरोधात उबाठा शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने शहरातील नवीन बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी उबाठा शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती?
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, उपमहा नगरप्रमुख प्रशांत सुरळकर, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपमहा नगरप्रमुख नीता सांगोळे, विभाग प्रमुख किरण भावसार, अण्णा भोईटे, कुसुंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, गणेश सोनवणे, शोएब खाटीक, निलेश ठाकरे, विजय बांदल, संजय सांगळे, शरीफ रंगरेज, कलीम खान, हर्षल मुंडे, राधे बाविस्कर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now