जळगाव जिल्हा

हातापायाची ताकद गमविलेल्या रूग्णाच्या मानेच्या मणक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेंदू व मणका विकार तज्ञांच्या प्रयत्नांना यश ; रूग्णाच्या चेहर्‍यावर फुलले हास्य

जळगाव लाईव्ह न्यूज ।13 मार्च 2024 । इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून पडल्याने मानेला झटका बसून हाता-पायाची ताकद गमविणार्‍या रूग्णावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. अनंत चोपडे यांनी केलेली अँटेरीअर सर्व्हायकल डिस्केक्टोमी अ‍ॅण्ड फिक्सेशनची अर्थात मानेच्या मणक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. दरम्यान रूग्णाच्या हातापायात असलेली कमजोरी दूर होऊन तो आता पुर्वीप्रमाणे चालू लागला आहे.

याबाबत माहिती अशी कि, शेगाव तालुक्यातील टाकळी बु. येथील श्रीकृष्ण सोळंकी हे आपल्या कुटूंबासह वास्तव्यास आहे. शेती करून ते त्यांचा उदरनिर्वाह चालवितात. श्रीकृष्ण सोळंकी हे इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर काम करीत असतांना त्यांचा पाय निसटला आणि ते खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या मानेला जोरदार झटका बसला. त्यांच्या कुटूंबियांनी तत्काळ त्यांना अकोला येथे रूग्णालयात दाखल केले. तात्पुरत्या उपचारानंतर हे दुखणे वर्षभर त्याने अंगावरच काढले. परिणामी त्याच्या हातापायाची ताकद कमी होऊ लागली होती. त्यांना चालणे देखिल शक्य होत नव्हते. तसेच उजव्या हाताची व पायाची हालचाल देखिल बंद झाली होती. अशा वेळी त्यांना अकोला येथे एमआरआय तपासणी केली असता मानेच्या मणक्यातील नस दबल्याचे निदान झाले.

त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र आर्थिक परिस्थीती जेमतेम असल्याने त्यांनी डॉ. उल्हास पाटील रूग्णालय गाठले. याठिकाणी मेंदू व मणका विकार तज्ञ डॉ. अनंत चोपडे यांनी श्रीकृष्ण सोळंकी याची तपासणी केली. विविध तपासणी अंती त्याच्या पाचव्या आणि सहाव्या मणक्यातील गादी सरकून नस दबलेली होती. निदानानंतर डॉ. अनंत चोपडे यांनी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून सरकलेली गादी काढून त्याठिकाणी कृत्रीम गादी बसविण्यात आली. या शस्त्रक्रियेला अँटेरीअर सर्व्हायकल डिस्केक्टोमी अ‍ॅण्ड फिक्सेशन असे म्हणतात. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात श्रीकृष्ण सोळंकी यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. सेजोल कश्यप आणि भूलशास्त्र तज्ञांनी सहकार्य केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button