जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२४ । मध्य रेल्वेकडून भुसावळमार्गे सहा विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. नागपूर-भुसावळ- पुणे ही विशेष गाडी १४ आणि १६ ऑगस्ट रोजी धावणार आहे.
०२१३९ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५ रोजी ०.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूरला पोहोचेल. तत्पूर्वी ही गाडी सकाळी ८.०५ वाजता भुसावळात थांबणार आहे. तर ०२१४० विशेष गाडी नागपूरहून १६ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि यानंतर सायंकाळी ७.२५ वाजता या रेल्वेला भुसावळात थांबा असेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ०२१४४ विशेष ट्रेन १४ आणि १६ रोजी नागपूरहून १९.४० वाजता
नागपूर-पुणे-नागपूर रेल्वे
निघेल आणि रात्री २.२० वाजता भुसावळात पोहोचेल. यानंतर पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पोहोचेल. ०२१४३ विशेष गाडी १५ आणि १७ रोजी पुण्याहून १६.१० वाजता निघेल आणि रात्री १२.१५ वाजता भुसावळला थांबेल. नंतर सकाळी ६.३० वाजता नागपूर पोहोचेल अशी माहिती रेल्वे विभागातर्फे देण्यात आली आहे