⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

मोदी सरकारची मोठी घोषणा, 75 लाख महिलांना मोफत LPG कनेक्शन देणार

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२३ । केंद्रातील मोदी सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला आज बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून या अंतर्गत 75 लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन वितरित केले जाणार आहे. पुढील 3 वर्षात उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना ही एलपीजी जोडणी दिली जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

काही दिवसापूर्वी देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजीच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. यापूर्वी एलपीजी गॅसची किंमत 1100 रुपये होती मात्र 200 रुपयांची कपात केल्यानंतर आता गॅस 900 रुपयांना मिळणार आहे. या सगळ्यात केंद्र सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, आणखी 75 लाख मोफत एलपीजी कनेक्शन दिले जातील. पुढील 3 वर्षात उज्ज्वला योजनेंतर्गत महिलांना ही एलपीजी जोडणी दिली जातील.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार
गॅसच्या दरात कपात केल्यानंतर उज्ज्वला योजनेचा सर्वाधिक फायदा लाभार्थ्यांना होणार आहे. याआधी त्यांना गॅसवर २०० रुपये सबसिडी मिळायची पण आता ४०० रुपये सबसिडी मिळणार आहे. 75 लाख एलपीजीच्या मोफत कनेक्शनच्या सरकारच्या घोषणेनंतर, देशातील उज्ज्वला लाभार्थ्यांची संख्या 9.60 कोटींवरून 10.35 कोटी होईल.