जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) ने मार्केटिंग ऑफिसर आणि फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

बँकेने या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया २० जानेवारी २०२६ रोजी सुरू झाली आणि ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू राहील. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. जर तुम्हाला चांगल्या बँकेत नोकरी करायची असेल तर ही उत्तम संधी आहे.

सेंट्रल बँकेत एकूण ३५० पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी मार्केटिंग ऑफिसर पदासाठी ३०० जागा राखीव आहे तर फॉरेन एक्सचेंज पदासाठी ५० जागांवर भरती केली जाणार आहे. त्यामुळे ही उत्तम संधी आहे.

आवश्यक पात्रता
फॉरेन एक्सचेंज ऑफिसर पदासाठी उमेदवारांनी ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एजुकेशन (AICTE)/ यूजीसीमधून ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत सीएफए, सीए, एमबीए पदवी प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. मार्केटिंग ऑफिसर पदासाठी AICTE/UGC से MBA/बिजनेस अॅनालिस्टमध्ये ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. २२ ते ३५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. यामध्ये पोस्टवाइज वयोमर्यादा असणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात होईल. लेखी परीक्षा झाल्यानंतर मुलाखत घेतली जाईल. ही मुलाखत मार्च किंवा एप्रिल महिन्यात घेतली जाईल. यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
इतका पगार मिळेल :
सेंट्रल बँकेतील या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४८,४८० ते १,०५,३८० रुपये पगार मिळणार आहे.
अर्ज कसा करावा?
सेंट्रल बँकेतील नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला centralbank.bank.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर रिक्रुटमेंट सेक्शनवर जायचे आहे.
यानंतर अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करायचे आहे. यानंतर आयबीपीएसची वेबसाइटवर ओपन होईल.
यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे.यानंतर लॉग इन करायचे आहे.
तुमची सर्व माहिती भरायची आहे. यानंतर फोटो आणि सही टाकायची आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर प्रिंट आउट काढा.







