---Advertisement---
जळगाव शहर

सिनेट निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचा 10 पैकी ९ जागांवर दणदणीत विजय

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२३ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सिनेटसाठी पदवीधरांमधून निवडून देण्याच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचचा दहापैकी नऊ जागांवर दणदणीत विजय झाला. यात राखीव संवर्गातून पाच तर खुल्या संवर्गातून ५ पैकी ४ असे दहा पैकी नऊ उमेदवार विद्यापीठ विकास मंचचे निवडून आले.

jalgaon election jpg webp

निवडून आलेले उमेदवार
अनुसूचित जमाती संवर्गातून नितीन ठाकूर, विमुक्त जाती / भटक्या जमाती संवर्गातून दिनेश चव्हाण, महिला संवर्गातून स्वप्नाली महाजन, इतर मागास संवर्गातून नितीन झाल्टे, अनुसूचित जाती संवर्गातून दिनेश खरात तर खुल्या संवर्गातील अमोल नाना पाटील, अमोल मराठे, अमोल सोनवणे, सुनील निकम आणि विष्णु भंगाळे विजयी झाले आहेत.

---Advertisement---

रविवार, २९ जानेवारी रोजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २७ मतदान केंद्रावर एकूण सरासरी ४९ टक्के मतदान झाले होते. १० जागांसाठी २७ उम्मेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत खुल्या संवर्गात ५ जागांसाठी ११ उमेदवार, इतर मागास संवर्गात एका जागेसाठी ३ उम्मेदवार, अनुसूचित जाती संवर्गात एका जागेसाठी ४ उमेदवार अनुसूचित जमाती संवर्गात एका जागेसाठी २ उमेदवार, विमुक्त जाती / भटक्या जमाती संवर्गात एका जागेसाठी ३ उमेदवार आणि महिला संवर्गात एका जागेसाठी ४ उमेदवार उभे होते. एकूण २२ हजार ६६३ मतदारांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ११ हजार १४१ मतदारांनी मतदानाचा डक बजावता आहे.

अनुसूचित जमाती संवर्गातून नितीन ठाकूर व भीमसिंग वळवी हे दोघे उमेदवार उभे होते. ११ हजार १४१ मतांपैकी ८५१ मते अवैध ठरली. नितीन ठाकूर यांना ७ हजार ६७६ मते प्राप्त झाली तर भीमसिंग वळवी यांना २ हजार ६१४ मते मिळाल्यामुळे ठाकूर यांना विजयी घोषित करण्यात आले.

विमुक्त जाती / भटक्या जमाती संवगातून दिनेश चव्हाण विजयी झाले. त्यांना ७ हजार १५१ तर प्रतिस्पर्धी नितीन नाईक यांना २ हजार २९२ व सचिन जाधव यांना ७४३ मते मिळाली. या संवर्गात ९५५ मते अवैध ठरली.

महिला संवर्गात स्वप्नाली महाजन यांना ६२३८ पहिल्या फेरीत कोट्यापेक्षा अधिक मते प्राप्त झाल्याने विजयी घोषित करण्यात आले, या संवर्गात वंदना पाटील यांना २ हजार ४६७, भाग्यश्री महाजन यांना ७२३ तर ज्योती कढरे यांना ५४७ मते प्राप्त झाली. या संवर्गात १ हजार अनुसूचित जाती संवर्गात ४ उमेदवार उभे होते विजयी होण्यासाठी ५ हजार ७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. ९९० मते अवैध ठरली. या संवर्गात दिनेश खरात यांना ६ हजार ७१९ मते प्राप्त झाल्याने विजयी घोषित करण्यात जाले नागसेन पेंढारकर यांना २ हजार ४७१, भगवान अंकुश यांना ६७९, राकेश महिरे यांना २८२ मते मिळाली. इतर मागास संवर्गात नितीन झाल्टे हे ६ हजार ८६० मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी नरेंद्रकुमार बोरसे यांना २ हजार ५१९, योगेश भावसार यांना ७४६ मते प्राप्त झाली यासंवर्गात ५ हजार ६३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. १ हजार १६ मते अवैध ठरली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---