जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL) ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.

या भरतीद्वारे 147 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. आणि २४ मे २०२५ पर्यंत उमेदवार आपला अर्ज करू शकतात.
ही पदे भरली जाणार?
1) मॅनेजमेंट ट्रेनी (Marketing) 10
2) मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) 10
3) ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव 125
4) ज्युनियर असिस्टंट (Cotton Testing Lab) 02
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MBA (Agri Business Management/Agriculture)
पद क्र.2: CA/CMA
पद क्र.3: 50% गुणांसह B.Sc (Agriculture) [SC/ST/PWD:45% गुण]
पद क्र.4: 50% गुणांसह डिप्लोमा (Electricals/Electronics/ Instrumentation) [SC/ST/PWD:45% गुण]
फी किती असेल?
या भरतीमध्ये, अर्जासोबत, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना 1500 रुपये शुल्क जमा करावे लागेल. याशिवाय, एससी/एसटी/पीएच प्रवर्गाला फॉर्मसोबत 500 रुपये द्यावे लागतील.
वयाची अट: 09 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
कसा कराल अर्ज?
अर्ज करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट cotcorp.org.in वर जा आणि नंतर भरती विभागात जा आणि भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला प्रथम To Register च्या शेजारी Click here वर टॅब करून आणि विनंती केलेले तपशील भरून नोंदणी करावी लागेल.
नोंदणी केल्यानंतर, उमेदवार आधीच नोंदणीकृत आहे का? To Login च्या शेजारी Click here वर टॅब करून आणि इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. शेवटी, उमेदवारांनी विहित शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा आणि त्याची प्रिंटआउट काढून ती त्यांच्याकडे सुरक्षित ठेवावी.
इतका पगार मिळेल?
मॅनेजमेंट ट्रेनी (Marketing) – 30,000/- ते 1,20,000/-
मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) – 30,000/- ते 1,20,000/-
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – 22000/- ते 90,000/-
ज्युनियर असिस्टंट – 22000/- ते 90,000/-
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा