जळगाव जिल्हामुक्ताईनगर

सुकळी येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे शिवजयंती निमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या सयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान सुकळी येथील दहा गरजु रुग्णांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून लाभ घेतला.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा समन्वक जितेंद्र गवळी, पवन सोनवणे, यांच्या नेतृत्वात शिबिर पार पडले. शिवसैनिक कल्पेश पाटील, पंढरीनाथ पाटील, जितेंद्र पाटील, विकास पाटील, सुनिल पाटील, किशोर पाटील यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

पुंडलीक पाटील, प्रमिला बावस्कर, पंडीत कोळी, दत्तु कोळी, जगन्नाथ पाटील, विश्वनाथ पाटील, बाळु धनगर, गयाबाई कोळी, विमलबाई राठोडमधुकर बावस्कर यांच्या सह रुग्णांनी सहभाग नोंदवत शस्त्रक्रिया करवुन घेतली. दरम्यान यापुढे ही अशाच प्रकारे आरोग्यविषयक वेगवेगळे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जितेंद्र गवळी यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button