⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | गुन्हे | जळगावच्या बीएचआर प्रकरणी आयपीएस अधिकारी अडचणीत, गृह विभागाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

जळगावच्या बीएचआर प्रकरणी आयपीएस अधिकारी अडचणीत, गृह विभागाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२४ । राज्यभर गाजलेल्या जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर प्रकरणातून एक बातमी समोर आलीय. बीएचआर प्रकरणी आयपीएस भाग्यश्री नवटाके यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गृह विभागाच्या आदेशानंतरत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आयपीएस भाग्यश्री नवटाके यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बीएचआर या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात 2021 मध्ये गुन्हा दाखल होता. या प्रकरणात त्यांनी विनाकारण तीन गुन्हे नोंदवल्याचा आरोप आहे. नवटाके या त्यावेळी पुणे पोलिसांच्या EOW विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या.नवटाके यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्याने त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के यांनी जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याने अडचणीत सापडल्या होत्या. नवटाके यांचं जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यानंतर भाग्यश्री यांना पोलीस सेवेतून बडतर्फ मागणी करण्यात आली होती. या वादग्रस्त वक्तव्यानंतर आयपीएस भाग्यश्री यांची बीडवरून छत्रपती संभाजीनगरला बदली झाली होती. आता भाग्यश्री नवटाके या भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणामुळे चर्चेत आल्या आहेत.

काय आहे बीएचआर प्रकरण?
जळगावच्या चाळीसगावात बीएचआर संस्थेच्या चार गाळ्यांमध्ये शाखा आहेत. या शाखा स्वत:च्या नावावर नसताना संस्थेचा प्रमुख प्रमोद रायसोनी व त्याची पत्नी कल्पना यांनी ८ फेब्रवारी २००६ साली मुख्य व्यवस्थापक माळीच्या मदतीने खोटे करारनामे केले. या करारनाम्यात गाळे स्वत:च्या नावावर असल्याचे नमूद केले. त्यानंतर या गाळ्यांचे डिपॉझिट म्हणून २५ लाख रुपये घेतले होते. तर देखभाल खर्चासाठी दरमहा पाच हजार रुपये घेतले होते.

पुढे २०१५ साली ही संस्था अवसायानात गेली. त्यानंतर या संस्थेच्या शाखा, डिपॉझिट, व्यवहार, डेडस्टॉक, आर्थिक व्यवहार तपासण्यात आले. यावेळी चाळीसगावातील चार गाळ्यांचे करारनामे खोटे असल्याचे आढळले. हे गाळे सुनीता वाणी यांच्याकडून कल्पना रायसोनी यांनी २००६ साली आठ लाख २५ हजारांना खरेदी केल्याचे आढळले. तर संस्थेत हे गाळे प्रमोद रायसोनीच्या नावे दाखवून पैसे काढून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर रायसोनी आणि माळी यांनी पसंसस्थेच्या सभासद, ठेवीदारांची फसवणूक आणि अपहार केल्याचे निष्पन्न झाले होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.